Type Here to Get Search Results !

MIM Morcha : कुणी दरवाजात, कुणी टपावर, वाहतूक नियम पायदळी, एमआयएमच्या मोर्च्यात तरुणांची हुल्लडबाजी

औरंगाबाद : मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या संरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादहून मुंबईकडे निघालेल्या एमआयएमच्या मोर्च्यात वाहतूक नियम पायी तुडवले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर तरुणांची हुल्लडबाजी सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुणी दरवाजात, कुणी टपावर, वाहतूक नियम पायदळी मुंबईकडे निघालेल्या मोर्चा अहमदनगरच्या पुढे पोहचला आहे. मात्र या मोर्च्यात असलेल्या चारचाकी गाड्यांमध्ये असलेल्या तरुणांकडून वाहतूक नियम सर्रासपणे तोडले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक तरुण गाडीच्या दरवाजातून थेट बाहेर लटकत आहे. तर कुणी गाडीच्या टपावर बसलं आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. शांततेत निघालेल्या मोर्चात तरुणांचा बेशिस्तपणा तर मोर्च्याच्या ताफ्यात आपली गाडी पुढे असावी यासाठी अतिवेगाने गाड्या चालवल्या जात असून, एकमेकांच्या गाड्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शांततेत निघालेल्या मोर्चात काही तरुणांचा बेशिस्तपणा लक्षवेधी ठरत आहे. मुसलमान हातात तिरंगा झेंडा घेऊ शकत नाहीत का? मुस्लिम आरक्षण तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीचं संरक्षण व्हावं अशा प्रमुख मागणीसाठी खासदार यांच्या नेतृत्वाखाली 'तिरंगा मोर्चा' मुंबईकडे रवाना झाला आहे. मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने जलील यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. मुंबईला येताना गाड्यांना तिरंगा झेंडा लावू नका, असा आदेश पोलिसांनी दिला. पोलिसांच्या आदेशावर जलील चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील मुसलमान हातात तिरंगा झेंडा घेऊ शकत नाहीत का? असा संतप्त सवाल इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. मुंबई पोलिसांकडून कलम १४४ लागू मुस्लिम आरक्षण वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात जलील यांच्यासह एमआयएमचे अध्यक्ष यांची आज मुंबईत सभा होत आहे. आज सकाळीच औरंगाबादवरुन एमआयएमच्या मोर्च्याने मुंबईच्या दिशेने कूच केलं आहे. दुपारपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल. मात्र, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच कलम १४४ लागू करत मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31V62eM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.