Type Here to Get Search Results !

मी पराभवही बघितला आहे, परंतु...; गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

बीडः 'मी सत्ता बघितली आहे. त्याचबरोबर पराभव ही बघितला आहे. परंतु, सत्ता असो किंवा नसो मी काम करत राहीन,' असं वक्तव्य भाजप नेत्या (Pankaja Munde) यांनी केलं आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळीतील गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दर वर्षी पंकजा मुंडेंकडून संकल्प केला जातो. यंदाही पंकजा मुंडे यांनी सेवा संकल्प केलाय. तसंच, आज त्या ऊसतोड कामगारांसोबत आजचा दिवस घालवणार आहेत. त्याचवेळी गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे यांनी समर्थकांना उद्देशून भाषण केलं आहे. वाचाः गोपीनाथ मुंडे यांच्या सर्व जाती- धर्म, सर्व पक्षातील लोक, गोरगरिबांसोबत स्नेह होता. त्यामुळेच आज अनेक जणांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. आजचा दिवस माझ्यासाठी नाही. तसाच तो माझाही दिवस नाही. तर, आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत करणार असल्याचा संकल्प करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. वाचाः आज गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीत शरद पवार साहेब सामील झाल्यासारखे मला वाटत आहे, असं म्हणत शरद पवारांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच, शरद पवार यांना देखील पंकजा मुंडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपीनाथ गडावर रक्तदान शिबिरासह अनेक विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अनेक सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. तसंच, त्या ऊसतोड कामगार मजुरांबरोबर जयंती साजरी करून त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dJ8isp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.