Type Here to Get Search Results !

तुळजाभवानी दर्शनाला गाडी शहरात वळली अन् तरुणांवर काळाचा घाला, १२ जण असलेल्या क्रुझरचा भीषण अपघात

जालना : पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याआधीच भक्तांवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तुळजापुर-सोलापूर महामार्गावरील बार्शी रोड पुलावर क्रुझरला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भिषण अपघात झाला. रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये १ मयत तर ११ भाविक जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. देव दर्शनाला जात असताना नियतीने हा घाव घातला . या बाबत प्राप्त झालेल्या माहिती तुळजापुर-सोलापूर महामार्गावर बार्शी रोड पुलावर हा अपघात झाला आहे. जालन्यावरून पंढरपूरकडे विठ्ठलाचे दर्शनासाठी क्रुझर क्रमांक MH३१ V ३२८१ जात होती. वाटेत आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी शहरात प्रवेश करत असताना अज्ञात वाहनाने क्रुझरला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की यामध्ये १ भावीक जागीच ठार झाला. तर ११ भाविक जखमी झाले आहेत. यात क्रुझरचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामध्ये जालना जिल्ह्यातील शेगाव येथील ११ युवक तरुण आहेत तर घनसांगवी येथील १ तरुण आहे असे एकूण १२ जण अपघातामध्ये होते. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे तर पोलीस पुढील तपास करत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक विकास माळी, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळी, पोलीस कॉन्स्टेबल सनी शिंदे, ए.एस आय चालक रवी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदतकार्य सुरू केले. पुढील उपचारासाठी जखमींना उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथून जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद इथे हलविण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Gw5SK0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.