Type Here to Get Search Results !

'ओह माय गॉड'; FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांचं 'ते' ट्विट चर्चेत

मुंबई: शिवसेना खासदार () यांच्याविरोधात दिल्लीतील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला नेत्यानं तक्रार केल्यानंतर हा एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. संजय राऊत यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती रावत भारद्वाज यांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे दिल्लीतील मंडावली पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. राजकीय सूडभावनेतून आणि माझा आवाज दाबण्यासाठीच हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे राऊत म्हणाले होते. त्यानंतर काही वेळाने राऊत यांनी दोन ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी 'त्या' शब्दाचा अर्थ सांगून आणि नेत्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात आयात केलेल्या काही भाजप नेत्यांकडून मूर्खपणाचे राजकारण केले जात आहे, त्यांच्यासाठी 'तो' शब्द वापरला होता. मात्र, त्याबद्दल दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला आहे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. दिल्लीत एफआयआर दाखल करणे म्हणजे सुशांतसिंह राजपूत प्रकरणासारखेच आहे. मुंबईत जे घडले त्याबद्दल बिहारमधील पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. 'इस शासन काल में कानून के हाथ इतने लंबे हो गये? OMG' असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याबाबत राऊत यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. 'त्या' शब्दाचा वापर केल्याने माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिंदी शब्दकोशानुसार 'त्या' शब्दाचा अर्थ मूर्ख असा आहे. तरीही माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येत आहे, याचा अर्थ दुसरा काही नाही. माझ्यावर फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. काही भाजप नेत्यांनी महिला नेत्यांविरोधात अनेकदा आक्षेपार्ह विधाने केली आहेत, मात्र, त्यांच्याविरोधात कुठे एफआयआर दाखल झाल्याचे ऐकिवात नाही, याकडेही त्यांनी ट्विटमधून लक्ष वेधले. आणखी काय म्हणाले संजय राऊत? दिल्लीत एफआयआर दाखल झाल्यानंतर राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपवर टीकास्त्र सोडलं. माझ्याविरोधात दिल्लीत दाखल झालेला एफआयआर हा राजकीय सूडभावनेतून आणि माझा आवाज दाबण्यासाठी केला आहे. ईडी, सीबीआय आणि आयकरचा वापर माझ्याविरोधात केला जाऊ शकत नाही, म्हणून माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठीच हे सगळं केले आहे. मी खासदार आहे आणि माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यासाठी काही लोकांना उकसवण्याचे काम केले जात आहे, ते योग्य नाही, असे राऊत म्हणाले. काय आहे प्रकरण? संसद भवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी संजय राऊत यांच्यावर टीका सुरू केली. या टीकेला उत्तर देताना राऊत संतापले. कुठेही राजकारण करू नका, शरद पवार हे पितृतुल्य आहेत. त्याजागी लालकृष्ण आडवाणी किंवा इतर कोणतेही ज्येष्ठ नेते असते, तर आपण त्यांच्यासाठीही खुर्ची आणून दिली असती. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्यांना ही बाब आवडली नसेल, ती त्यांची विकृती आहे, असं म्हणत त्यांनी 'तो' शब्द वापरला होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oQCwQM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.