Type Here to Get Search Results !

एमआयएमच्या मोर्चात 'तिरंगा'च का? इम्तियाज जलील यांनी सांगितलं खरं कारण...

औरंगाबाद : मुस्लिम आरक्षण या प्रमुख मागणीसाठी एमआयएमकडून मुंबईत आज मोर्चा काढण्यात आला आहे. मात्र, या मोर्चात सर्वाधिक लक्ष ठरत आहे ते म्हणजे, या मोर्चात कोणत्याही रंगाचा किंवा पक्षाचा झेंडा नसून प्रत्येकाकडे फक्त तिरंगा पाहायला मिळत आहे. पण एमआयएमच्या मोर्च्यात 'तिरंगा'च का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्राचा मुस्लिम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का? असा सवालही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. ( Why Tricolor in MIM march imtiaz jaleel said the real reason ) मोर्चात तिरंगाबाबत बोलताना जलील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त देशभर अमृत महोत्सव साजरे करण्यात येत असून त्याअनुषंगाने एमआयएम पक्षाच्यावतीने मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून मुस्लिम समाजास आरक्षण मिळावे आणि महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी आंदोलन करत आहोत. अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या मोर्च्यात तिरंगा घेऊन महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जलील म्हणाले. अफाट मोर्चा... औरंगाबादहून निघालेला मोर्चा आता अहमदनगर जवळ पोहचला असून या मोर्च्यात ३०० पेक्षा अधिक चारचाकी वाहने असून अफाट असा मोर्चा मुंबईकडे रवाना होत आहे. विशेष म्हणजे या मोर्च्यात तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. पण मुंबईत मोर्चाला नो एन्ट्री असल्याचं गृहमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 'मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका' नगर सीमेवर इम्तियाज जलील आणि पोलिसांमध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी गाडीवर तिरंगा लावण्यास मनाई केली. त्यावरुन हा वाद झाला. मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असा आदेश पोलिसांनी दिला. हा आमच्या पक्षाचा झेंडा नाही. आमच्या स्वाभिमानाचा हा झेंडा आहे. महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. (muslim reservation in maharashtra Why Tricolor in MIM march imtiaz jaleel said the real reason ) (muslim reservation in maharashtra Why Tricolor in MIM march imtiaz jaleel said the real reason )


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33m49c0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.