Type Here to Get Search Results !

मुसलमान तिरंगा हातात घेऊ शकत नाहीत का? खा. इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल

औरंगाबाद : मुस्लिम आरक्षण तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीचं संरक्षण व्हावं अशा प्रमुख मागणीसाठी औरंगाबादचे एमआयएमचे खासदार यांच्या नेतृत्वाखालील 'तिरंगा मोर्चा' औरंगाबादवरुन मुंबईकडे रवाना झाला आहे. मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने जलील यांच्यासह एमआयएमचे कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. मुंबईला येताना गाड्यांना तिरंगा झेंडा लावू नका, असे आदेश पोलिसांनी एमआयएम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला. पोलिसांच्या आदेशावर जलील चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. 'महाराष्ट्रातील मुसलमान हातात तिरंगा झेंडा घेऊ शकत नाहीत का?' असा संतप्त सवाल इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात जलील यांच्यासह एमआयएमचे अध्यक्ष यांची आज मुंबईत सभा होते आहे. आज सकाळीच औरंगाबादवरुन एमआयएमच्या मोर्च्याने मुंबईच्या दिशेने कूच केलं आहे. दुपारपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल. मात्र, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे. "मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असे आदेश पोलिसांनी काढले आहेत. मला त्यांना सांगायचंय की, तिरंगा झेंडा आमच्या पक्षाचा झेंडा नाही तर आमच्या स्वाभिमानाचा झेंडा आहे. महाराष्ट्रातील मुसलमान हातात तिरंगा झेंडा घेऊ शकत नाही का?, हाच प्रश्न आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जातोय", असं जलील म्हणाले. "ज्यावेळी राज्यात शिवसेना भाजपचं सरकार होतं, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणासाठी भांडत होते, मात्र आता तेच सत्तेत बसले आहेत. गेली अडीज वर्ष त्यांनी मुस्लिम आरक्षणावर एक चकार शब्दही काढला नाही. मला त्यांना आता विचारायचंय, तुम्ही गप्प का?, मुस्लिम समाज आणि आरक्षणाचा एवढा कळवळा होता, तर मग आता मुस्लिम समाजाला आरक्षण का देत नाही", अशा शब्दात जलील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा समाचार घेतला. शिवसेनेचा समाचार घेताना जलील म्हणाले, "जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदानं बुक करायला जातो, तेव्हा तेव्हा तिथे शिवसेना, सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन आयोजकांना धमक्या देत असतात, कार्यक्रम रद्द करायला भाग पाडत असतात, पण मला आज त्यांना सांगायचंय, की तुम्ही कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, आमचा आवाज दबणार नाही" मुंबईत कलम १४४ लागू मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे. तसेच मुंबईत जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे. मालेगाव आणि अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसंच ओमिक्रॉनचं वाढतं संकट पाहता सावधगिरी म्हणून प्रशासनानेही मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे एमआयएमचा मोर्चा आता मुंबईत कसा प्रवेश करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी मुंबईच्या वेशीवर मुलूंड चेकनाक्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी राज्य राखीव पोलीस दलही तैनात आहे. मुलूंड चेकनाक्यावर औरंगाबाद आणि नगर पासिंगच्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yifogM

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.