Type Here to Get Search Results !

शिर्डीत अग्नितांडव! लाखो रुपयांचे नुकसान; युनियन बँक थोडक्यात बचावली

सचिन बनसोडे । अहमदनगर/शिर्डी नगर-मनमाड महामार्गालगत असणाऱ्या प्लास्टिक मटेरियल दुकानाला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील येथे घडली आहे. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान शिर्डीत ही घटना घडली असून बाजूला असलेली युनियन बँक व एटीएम सेंटर थोडक्यात बचावले आहे. शिर्डी येथे नगर मनमाड रस्त्याच्या लगत युनियन बँकेच्या शेजारी चांगदेव कसबे यांचे ओम साई ट्रेडर्स नावाने दुकान असून प्लास्टिक मटेरियल सह हॉटेल मटेरियल आणि लग्न समारंभासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची होलसेल दरात विक्री केली जाते. कसबे हे नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अचानक या दुकानाला आग लागली. दुकानात प्लास्टिक मटेरियलसह विक्रीसाठी ठेवलेले ॲसिडचे कॅन असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातून स्फोट झाल्यासारखे आवाज येऊ लागल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या दुकानाच्या बाजूलाच युनियन बँकेचे एटीएम मशीन व इमारतीत युनियन बॅंकेची शाखा तसेच हॉटेल्स आणि रहिवासी परिसर असल्याने मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र शिर्डी नगरपंचायत, साईबाबा संस्थान तसेच राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. मात्र ओम साई ट्रेडर्स या दुकानासह त्यांचे गोडावून आगीत भस्मसात झाल्याने सुमारे १२ ते १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकान मालक चांगदेव कसबे यांनी सांगितले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. फायर सेफ्टीचा मुद्दा ऐरणीवर शिर्डीत मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, लॉजिंग, रहिवासी इमारती तसेच विविध बँका आहेत. मात्र अनेकजण फायर सेफ्टी ऑडीटच्या बाबतीत दुर्लक्ष करत असून अनेकांचे ऑडीट झाले नसल्याने ही बाब मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते. शिर्डीत मोठ्या संख्येने साई भक्त येत असतात. स्थानिक राहिवाशांसह साई भक्तांची सुरक्षा देखील महत्वाची आहे. त्यामुळे शिर्डी नगरपंचायतीने फायर सेफ्टीसाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31GUhcv

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.