पुणेः पुण्यातील आंबिल ओढ्यालगतच्या घरांवर आज महानगर पालिकेच्या अतक्रमण विरोधी पथकानं कारवाई करत स्थानिकांची घरे पाडण्यास सुरुवात केली आहे. स्थानिकांनी या कारवाईला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिकांच्या विरोधाला न जुमानताही कारवाई सुरुच आहे. आमची घर पाडल्यावर आम्ही राहणार कुठे?; असा सवाल स्थानिकांनी केला आहे. 'आमची घरं तोडण्याचं काम सुरु आहे. आम्ही जायचं कुठे, पोलिसांनी आमच्या लोकांनी चौकात नेलंय. काही लोकं दुसऱ्या ठिकाणी गेले. खाली जाऊन बघितलं तर सगळी घरे तुटली,' असा आक्रोश एका चिमुकल्यानं केला आहे. महापालिकेनं आज सकाळी सात वाजता आंबिल ओढ्यालगतच्या घरावर कारवाई केली आहे. यावेळी नागरिकांनी महापालिकेनं कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप केला आहे. तसंच, पालिकेनं बिल्डरच्या लेटरहेडवर नोटीस काढल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. मात्र, सदर जागा ही पुणे महापालिकेची असून बिल्डर नोटीस कसा काय पाठवू शकतो?, असा सवाल उपस्थित होत आहे. वाचाः तसंच, भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं, पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि कारवाई करण्यात आली, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, या अतिक्रमणामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे, असा आरोप काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. पुणे महापालिकेचे सत्ताधारी आणि बिल्डरचे लागेबंधे असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jdhJnR