Type Here to Get Search Results !

नवी मुंबई विमानतळ वाद: मनसेचा आमदार आंदोलनात उतरल्यानं चर्चेला उधाण

ठाणे: नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास () लोकनेते दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त आज सिडको कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. ठाणे जिल्ह्यातून हजारो भूमिपुत्र नवी मुंबईकडे निघाले आहेत. मनसेचे कल्याण (ग्रामीण)चे आमदार () हेही यात सहभागी झाले आहेत. मनसे अध्यक्ष यांनी नामकरणावरून भूमिका मांडल्यानंतरही राजू पाटील आंदोलनात सहभागी झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. नवी मुंबईतील विमानतळास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तर, प्रकल्पग्रस्तांसाठी लढा उभारणारे, स्थानिक नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळास दिलं जावं, अशी स्थानिकांची मागणी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्या या विमानतळा छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असणार आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर चर्चा होऊच शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. वाचा: राज यांच्या या भूमिकेनंतरही राजू पाटील आजच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी याबाबत खुलासा केला. ' हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन असेल, त्याचा आयएटीए कोड BOM हाच असेल तर त्याला आपोआपच शिवाजी महाराजांचं नाव मिळेल. जुन्या विमानतळाला नवं नाव देण्याची आमची मागणी नाही. पण नवीन विमानतळ होणार असेल तर दि. बा. पाटील यांचंच नाव दिलं जावं असं आमचं म्हणणं आहे,' असं राजू पाटील म्हणाले. 'राज ठाकरे साहेबांनी कोणाच्याही नावाला विरोध केला नव्हता किंवा पाठिंबा दिला नव्हता. त्यांनी वस्तुस्थिती मांडली होती,' असंही राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. 'आंदोलनासाठी हजारो लोक गावागावांतून येत आहे. खरंतर मुख्यमंत्र्यांना ही परिस्थिती टाळता आली असती. कोविडचा काळ आहे. तिसरी लाट येईल असं मुख्यमंत्री स्वत: सांगत आहेत. मग त्यांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावलं? त्यांना फिकीर नसेल तर आमची मागणी मांडणं हा आमचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत,' असं राजू पाटील म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zQNEQR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.