Type Here to Get Search Results !

Weather Update : औरंगाबादसह मराठवाड्यात ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली

औरंगाबाद : पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर औरंगाबादसह मराठवाड्यात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, शेतातील पिकं काढण्यासाठी बळीराजा धावपळ करत आहे. राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सकाळपासून औरंगाबादसह मराठवाड्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही भागात पाऊस सुद्धा पडत असल्याचर पाहायला मिळत आहे. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस वेचणी सुरू असतानाच जर पाऊस पडला तर कापसाचे बोंड ओली होऊन खराब होऊ शकतात. तसेच अनेक भागात कांदा काढणीसाठी आला आहे तर, काही ठिकाणी कांदा शेतात काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d92Ezm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.