Type Here to Get Search Results !

साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; कार-ट्रक समोरासमोर धडकले आणि...

सातारा: दहिवडी येथे मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्विफ्ट कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही मृत दहिवडी गावातीलच आहेत. (Car-Truck collision at Dahiwadi in ) दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय २२), स्वयंम सुशील खरात (वय १६) आणि अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटणहून दहिवडीला येत होते. त्याचवेळी एक ट्रक दहिवडी बाजूकडून फलटणच्या दिशेने चालला होता. दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला, तर कारला धडकलेला ट्रक उलटून रस्त्याच्या बाजूला पडला. या अपघातात पियुष आणि स्वयंम हे दोघे जागीच ठार झाले, तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे. हेही वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o9ejo8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.