Type Here to Get Search Results !

nawab malik: नवाब मलिक यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले, 'माझ्या घरी आज वा उद्या...'

मुंबई: एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एक ट्विट केले आहे. मात्र हे ट्विट टीका करणारे, किंवा एखाद्या गोष्टीचा पर्दाफाश करणारे किंवा आरोप करणारे नसून या ट्विटद्वारे त्यांनी सरकारी पाहुण्यांबाबत माहिती दिली आहे. आपल्या घरी आज किंवा उद्या येणार आहेत असे मी ऐकले आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (Minister has tweeted that government guests are coming to my house today or tomorrow) नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मित्रांनो, माझ्या घरी आज किंवा उद्या सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही या सरकारी पाहुण्यांचे स्वागतच करू, असे सांगतानाच घाबरणे म्हणजे रोज रोज मरणे असते. आम्ही घाबरणार नाही. आम्हाला लढायचेच आहे. क्लिक करा आणि वाचा- 'गांधी गोऱ्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू' आमच्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करू, घाबरणार नाही असे सांगतानाच नवाब मलिक यांनी विरोधकांवर हल्लाबोलही केला आहे. महात्मा गांधी हे गोऱ्यांशी लढले. त्याच प्रमाणे आम्हीही आता चोरांशी लढू असे मलिक यांनी म्हटले आहे. 'गांधी लडे थे गोरों से, हम लडेंहे चोरों से', असे मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी वानखेडे प्रकरणात मुंबई हायकोर्टात आज हमी देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. बिनशर्त माफी मागतो आणि यापुढे अशी विधाने करणार नाही, अशी हमी देत नवाब मलिक यांनी कोर्टात खेदही व्यक्त केला. क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिक यांचे ट्विट- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31Qwczk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.