Type Here to Get Search Results !

कोरोनात विधवा झालेल्या महिलांसाठी महिला आयोग सरसावला, चाकणकरांनी घेतला मोठा निर्णय

गडचिरोली : विधवा झालेल्या महिलांकडे समाज एका वेगळ्या दृष्टीने बघतो. हीच दृष्टी आणि दृष्टीकोन बदलण्याचं महिला आयोगाने ठरवलं आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील राहणार आहे. कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी महिला आयोग संवेदनशीलपणे प्रयत्न करणार असून वेगवेगळ्या मंत्रालयाच्या योजना या महिलांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी सांगितले. विधवा महिलांच्या रोजगारासाठी योजना बनवण्याचा प्रयत्न करणार 'कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती'च्या सदस्यांसोबत रुपाली चाकणकर यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात कोरोनात विधवा झालेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा शासनाचा प्राधान्यक्रम असून त्यासाठी महिला विकास आर्थिक महामंडळाशी चर्चा करून त्यांच्या रोजगारासाठी योजना बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करु असे त्यांनी सांगितले. 'कोरोना विधवा पुनर्वसन समिती'चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करुन या महिलांच्या विविध समस्या मांडल्या व इतर राज्य सरकारांनी जशी एकरकमी मदत केली तशी मदत महाराष्ट्र सरकारने करावी अशी विनंती केली. त्यानंतर जयाजी पाईकराव यांनी हॉस्पिटलने लूट केलेल्या कुटुंबांचे ऑडिट व्हावे यासाठी तक्रारी दाखल केली आहे. त्याबाबत तातडीने सुनावणी होण्याची मागणी केली तर गडचिरोलीच्या शुभदा देशमुख यांनी या महिलांच्या रोजगारासाठी काय करणे शक्य आहे याबाबत विविध मुद्दे मांडले. विधवा महिलांच्या अडचणी, चाकणकरांसमोर अनेकांकडून गाऱ्हाणी संजय गांधी निराधार योजनेतील अनेक त्रुटी नाशिक जिल्ह्यातील विद्या कसबे यांनी मांडल्या. अहमदनगर येथील अशोक कुटे यांनी कोरोना कर्जबाजारी असल्याने पतसंस्था व बँक खाते तगादा लावत असल्याने त्या सध्या अतिशय चिंतेत असल्याने बँका पतसंस्थांना आदेश व्याजमाफीचे आदेश देण्याची महत्त्वाची मागणी केली. ज्येष्ठ कार्यकर्त्या रेणुका कड यांनी महिलांच्या मालमत्ताविषयक अधिकार याबाबत शासनाने कायद्याची अंमलबजावणी करून पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली. रुपाली चाकणकर यांचा शब्द या सर्व मुद्द्यांवर रुपाली चाकणकर यांनी तपशीलवार प्रतिसाद दिला व त्याचबरोबर या सर्वच प्रश्नांवर संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून कार्यकर्त्यांसोबत बैठका आयोजित करणार असल्याचे सांगितले. या एकल महिलांच्या प्रश्नावर राज्य सरकार धोरण आणण्याचा प्रयत्न करत असल्याने महिला आयोग सकारात्मक भूमिका बजावेल, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pLjFFU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.