Type Here to Get Search Results !

धक्कादायक! दक्षिण आफ्रिकेतील 'त्या' करोनाग्रस्त प्रवाशासोबत होता आणखी एक डोंबिवलीचा प्रवासी, केडीएमसी सतर्क

डोंबिवली: दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या ३२ वर्षीय रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले असून अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. केडीएमसीकडून त्याच्या कुटुंबीयांची देखील टेस्टिंग करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या रुग्णासोबत विमानात ४२ सहप्रवासी होते. या ४२ प्रवाशांची यादी केडीएमसीने शासनाला दिली असून ज्या भागात प्रवासी राहतात त्या त्या महापालिकेकडून त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. दरम्यान या ४२ मधील आणखी एक प्रवासी डोंबिवली मधील असल्याचं आढळून आलं आहे. (another dombivli passenger was accompanied by a coron positive passenger who came from ) क्लिक करा आणि वाचा- डोंबिवलीचा हा प्रवासी ५० वर्षीय असून त्याने त्याच विमानातून दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास केला होता. या प्रवाशाची आज कोरोना चाचणी होणार असून केडीएमसीकडून त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. या प्रवाशाची प्रकृती स्थिर असल्याचे केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान करोना चाचणीनंतर या ५० वर्षीय प्रवाशाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असल्याचे केडीएमसी साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, डोंबिवलीत २३ नोव्हेंबर रोजी नायझेरिया येथून सहा प्रवासी आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली आहे. या सहा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती केडीएमसी च्या आरोग्य विभागाने दिली आहे. नायझेरियातून आलेले सहा प्रवासी आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून या प्रवाशांच्या कुटुंबीयांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d9RGd7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.