Type Here to Get Search Results !

पुण्यात धोका वाढला! नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये आलेले दोन नागरिक करोना पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवड: करोनाच्या नव्या व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी राज्य सरकारसह सर्व महापालिकांनी जय्यत तयारी केली असली तरी या विषाणूची धास्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. परदेशातून परतलेले व करोना पॉझिटिव्ह निघालेले नागरिक यासाठी कारण ठरले आहेत. आफ्रिकन देशातून जिल्ह्यात परतलेले तिन्ही नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील दोघे पिंपरी-चिंचवडचे आहेत. त्यामुळं जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. ( Scare in Pune District) नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओमायक्रॉनचा संसर्ग पसरला. जगातील १५ देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आता भारतात सुद्धा केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने विषाणूला अटकाव करण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. परदेशातून आलेल्या लोकांची आर. टी. पी सी. आर. टेस्ट करण्यात येत आहे आणि प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्याची पुढील लॅब टेस्ट करण्यात येत आहे. याच तपासणी प्रक्रियेमुळं नायजेरियातून पिंपरी चिंचवाडमध्ये आलेले दोन नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या चाचणी अहवालातून समोर आले आहे. आता पुण्यातील एन. आय. व्ही येथे त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. वाचा: दक्षिण आफ्रिकेतून १५ दिवसांपूर्वी पुण्यात आलेली एक व्यक्ती देखील करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे की कसे, याची खातरजमा करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यातच आत आणखी दोघे पॉझिटिव्ह आढळ्यानं पुणेकरांची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्याप्रमाणं, ओमायक्रोनचे म्युटेशन डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही जलद गतीनं होते. त्यामुळं या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास मोठं संकट ओढवण्याची शक्यता आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pgsGq7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.