Type Here to Get Search Results !

पवार-ममतादीदींची थोडयाच वेळात होणार भेट; काँग्रेसची अडचण वाढणार का?

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री (Mamta Banerjee) मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे आज दुपारी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद (Shard Pawar) यांची भेट घेत आहेत. राजकीय दृष्ट्या ममतादीदींच्या या दौरा महत्वाचा मानला जात असून यांच्याशी त्या काय चर्चा करणार याची सर्वांनाच उत्सुक लागली आहे. ( and are meeting today but the question is whether this meeting will increase the difficulty of the congress) शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातील एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून केली. मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर काल संध्याकाळी त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जय मराठा, जय बांगला असा नारा देत आपली राजकीय वाटचाल कशी असेल याचे संकेत दिले. क्लिक करा आणि वाचा- आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असं ममतांनी जाहीर केलं होतं. मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे बायोबबलमध्ये असल्याने त्यांची भेट त्या घेऊ शकल्या नाहीत. असं असलं तरी शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची त्या भेट घेत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडणाऱ्या शरद पवार यांना ममतादीदी भेटल्यानंतर राज्याच्या राजकारणात काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत त्या महाविकास आघाडीसोबत वेगळी रणनीती आखणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसच्या अडचणीत वाढ होणार का? ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाचे संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. ममतादीदी दिल्लीत असताना सोनिया गांधी यांची भेट घेणे टाळले आहे. राज्याच्या राजकारणात पवारांचा वरचष्मा आहे. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. मात्र, आगामी निवडणुकांसाठी ममतादीदी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास या नव्या संभाव्य आघाडीत काँग्रेस पक्ष असेल की नाही, हा खरा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्राचा विचार करता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या तरी काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक आहे. आता या संदर्भात ममतादीदी पवार यांच्या भेटीत काय चर्चा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. क्लिक करा आणि वाचा- खरे तर देशात भाजपविरोधी आघाडी तयार करताना ममतादीदींसारख्या नेत्यांच्या मनात काँग्रेस विरोधाचाही सूर आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपविरोधी पण बिगरकाँग्रेस आघाडी तयार झाल्यास महाराष्ट्रात काँग्रेसची भूमिका काय असेल, आणि अशी बिगरकाँग्रेस आघाडी राज्यात यशस्वी होईल का हा अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच जय मराठा जय बांगला या ममतादीदींच्या नाऱ्यामध्ये काँग्रेसचे स्थान काय हा ही प्रश्न महत्वाचा बनला आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्यासारखे अनुभवी आणि मुरब्बी नेते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3o8SogU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.