Type Here to Get Search Results !

'एमआयएम'चा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न दोनदा अपयशी, आता नगरमध्ये...

विजयसिंह होलम । अहमदनगरमुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादहून मुंबईकडे निघालेला एमआयएमचा मोर्चा औरंगाबादमध्ये अडविण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता नगरमध्ये तो अडविण्याचा हालचाली सुरू आहेत. नगर-औरंगाबाद रोडवर दोन ठिकाणी प्रयत्न झाला. मात्र, आता हा मार्चा नगर शहराच्याजवळ दाखल झाला आहे. नगरमध्ये एमआयआयएमचे कार्यकर्ते स्वागतासाठी तर पोलिस बंदोबस्तासाठी थांबले आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखी आज सकाळी सात वाजता औरंगाबादच्या आमखास मैदानाहून हा मोर्चा मुंबईकडे रवाना निघाला आहे. मुंबईत मोर्चाला बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तो मुंबईबाहेर अडविण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात असे प्रयत्न झाले. मात्र, तेथूनही मोर्चा पुढे रवाना झाला. त्यानंतर नगर जिल्ह्यात नेवासा फाटा येथे नगर पोलिसांनी मोर्चा थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चेनंतर ताफ्याला पुढे जाऊ देण्यात आले. आता हा ताफा नगर शहराजवळ पोहचला आहे. शहरात शेंडी बायपास, पोलिस अधीक्षक चौक आणि कोठला मैदान येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर एमआयएमचे कार्यकर्तेही मोर्चाच्या स्वागतासाठी कोठला मैदान येथे थांबले आहेत. तेथून आणखी काही जण या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. वाचा: पोलिसांनी हा मोर्चा नगरजवळच थांबवून परत पाठविण्यासाठी नियोजन केल्याची माहिती आहे. मात्र, ताफ्यातील वाहनांची संख्या, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यासाठी सोयीची जागा शोधण्यात येत असून त्या ठिकाणी हा मोर्चा थांबवायचा, मोर्चेकऱ्यांचे सरकारच्या प्रतिनिधींशी बोलणे करून द्यायचे आणि कोणत्याही परिस्थिती त्यांना मुबंईपर्यंत जाऊ दयायचे नाही, असे नियोजन पोलिसांचे असल्याचे समजते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lR3R3a

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.