Type Here to Get Search Results !

लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने पैशांसाठी जीम ट्रेनरनं केलं 'हे' कृत्य

म. टा. प्रतिनिधी, काळात लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्या जीम ट्रेनरने अर्थाजनासाठी चोरीचा मार्ग पत्करल्याचे समोर आले. जीम ट्रेनरने आणि त्याच्या पत्नीने एका सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने जाऊन एक लाख १२ हजार रुपये किमतीच्या मंगळसूत्राचा अपहार केला. समर्थ पोलिसांनी या जीम ट्रेनरला अटक केली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल राजेश गायकवाड (वय २३, रा. शिवणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून चोरीचे मंगळसूत्र जप्त केले असून, आरोपी दाम्पत्याला एक लहान अपत्य असून, महिला गरोदर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठेतील परमार ज्वेलर्स येथे गायकवाड सेल्समनचे काम करतात. ३० नोव्हेंबरला दुपारी सव्वाबारा वाजता गायकवाड सराफी पेढीत असताना, एक पुरुष आणि महिला दागिने विकत घेण्याचा बहाणा करून तेथे आले. त्यांनी अंदाजे २२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पाहिले. मात्र, मंगळसूत्र खरेदी न करता तेथून काढता पाय घेतला. ते गेल्यानंतर दुकानातून मंगळसूत्र गायब असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. समर्थ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे सहायक निरीक्षक संदीप जोरे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी परमार ज्वेलर्स येथे पाहणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. आरोपींनी गुन्ह्यात वापरेल्या दुचाकीचा नोंदणी क्रमांक 'सीसीटीव्ही' फुटेजमधून प्राप्त झाला. त्याद्वारे चौकशी केली असता आरोपी महिलेच्या नावावर दुचाकी असल्याचे समोर आले. लॉकाडउनने हिरावले उत्पन्नाचे साधन आरोपी जीम ट्रेनरचे काम करत होता. करोना आणि लॉकडाउननंतर त्याच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यामुळे त्याने आणि त्याच्या पत्नीने सोनाराच्या दुकानात जाऊन मंगळसूत्र विकत घेण्याचा बहाणा केला. सेल्समनचा विश्वास संपादन करून मंगळसूत्र कसे दिसते हे पाहण्यासाठी गळ्यात घालून पाहिले. सेल्समनचे लक्ष विचलित करून मंगळसूत्राचा अपहार केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे समर्थ पोलिसांनी सांगितले. समर्थ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक निरीक्षक संदीप जोरे, हवालदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, महेश जाधव, नीलेश साबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oJM5AR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.