Type Here to Get Search Results !

अजित पवारांची एसटी कामगारांना विनंती; म्हणाले, काम सुरू करा, इथून पुढे...

बारामती: राज्य सरकारनं पगारवाढीची घोषणा करूनही कामगारांचा संप () सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर कर्चमचारी अडून बसले आहेत. या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा कामावर येण्याचं आवाहन केलं. 'असा हट्टीपणा कधीच चालत नाही,' असं परखड मतही अजित पवार () यांनी मांडलं. बारामतीतील माळेगाव येथे राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर अजित पवार यांनी पुन्हा भूमिका मांडली. 'एसटीच्या प्रश्नावर संपूर्ण विचारांती जो काही मार्ग काढता येईल, तेवढा प्रयत्न केलेला आहे. डेपोतील कर्मचाऱ्यांनाही विनंती केली आहे. सरकारनं चांगली पगार वाढ दिलेली आहे. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, तो उच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीपुढं आहे. त्या समितीचा निर्णय आम्ही मान्य करू असं खुद्द परिवहन मंत्र्यांनी न्यायालयात सांगितलंय. त्यामुळं कामगारांनी आता एसटी सुरू करावी,' असं अजित पवार म्हणाले. वाचा: 'राज्यात आता शाळा सुरू झाल्य आहे, मुलामुलींना शाळेत जायला एसटी नाही. गोरगरिबांना एसटीची गरज लागते. त्याचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा. कामगारांना बाकीच्या सुविधा देत असताना आम्ही पाच-सहा राज्यांच्या महामंडळाचा आढावा घेतला. या महामंडळाच्या बरोबरीनं व अनेक बाबतीत थोडं जास्त आम्ही आपल्या कामगारांना देऊ केलंय. एसटी आपलीच आहे या भावनेनं एक मध्यममार्ग काढला आहे. मात्र, काहीजण आजही भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. वाचा: 'असा हट्टीपणा कधीच चालत नाही. असं सरकार चालूच शकत नाही. असं केलं तरच आम्ही काम करू, असं एखाद्या संस्थेतील लोक म्हणायला लागले तर संस्था कशी चालेल? जे व्यवहारानं असेल ते होईल. राज्य सरकारला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. तिकीटांचे दरही जास्त वाढवता येत नाहीत. सरकार एसटी महामंडळामध्ये पैसे घालतंच आहे. करोनाच्या काळातही मदत केली. इथून पुढे डिझेलची बस खरेदी केली जाणार नाही. सीएनजी किंवा इलेक्ट्रिकचीच बस घेतली जाईल,' असं अजित पवार म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3duymHr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.