Type Here to Get Search Results !

'अधिकाऱ्यांनो, नियमात काम करा, सरकारचा टांगा कधीही पलटी होईल'

अहमदनगर: ‘राज्यातील () सरकारचा टांगा कधी पलटी होईल सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही मंत्र्यांच्या दबावाखाली न येता नियमात काम करा. उगाचच शेतकऱ्यांना डिवचू नका. आम्ही तुम्हाला आठ दिवसांची मुदत देत आहोत. तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून द्या,’ अशी तंबी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री () यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. b तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नांच्या संदर्भात वीज वितरण कंपनी कार्यालयावर विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला. वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. या ठिकाणी झालेल्या सभेत आमदार विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारचा समाचार घेतला. वाचा: विखे पाटील म्हणाले, ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त वसुलीचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. या सरकारला फक्त घ्यायचे माहिती आहे, द्यायचे माहिती नाही. मागील दोन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत केलेली नाही. दारूचे कर माफ करणारे सरकार शेतकऱ्यांना मात्र मोफत वीज देऊ शकत नाही. आज तुम्ही शेतकऱ्यांच्या डीपी बंद केल्या, उद्या तुम्हाला बंद करण्याची वेळ आणू नका. शेतकऱ्यांना वीज बिलासाठी शेतकऱ्यांना वेठीस धराल तर कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. सरकारमध्ये सर्वच मंत्री आता मुख्यमंत्री झाल्यासारखे वागत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे यांना कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी नाही. आपले अपयश झाकण्यासाठी सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवून मोकळे होते. मदत करायची फक्त केंद्र सरकारने. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री मात्र बंगल्यात बसून आहेत. यांना आता गावात फिरून देऊ नका. या सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडून महापाप केले आहे याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल. मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन अधिकाऱ्यांनीही आपला कारभार करू नये. आघाडी सरकारचा टांगा पलटी कधी होईल सांगता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या नियमात काम करा. उगाचच शेतकऱ्यांना डिवचू नका. आम्ही तुम्हाला आठ दिवसांची मुदत देत आहोत. तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून द्या अन्यथा याच कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल,’ अशा इशाराही विखे पाटील यांनी दिला. वाचा: भाजपचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, जेष्ठ नेते वसंतराव गुंजाळ, भाजपाचे किसान आघाडी जिल्हाध्यक्ष सतिष कानवडे, युवा मोर्चाचे अॅड. श्रीराज डेरे, जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहिणी निघुते, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, गुलाबराव सांगळे यांच्यासह कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ImNZiC

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.