Type Here to Get Search Results !

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने गंडा; शिवसेना खासदाराच्या पुतण्यासह बँकेच्या संचालकांवर गुन्हा

पुणे: थेरगाव येथे सुरू असलेल्या बांधकाम साईट मधील फ्लॅट विक्रीसाठी ५० लाख रुपये घेऊन देखील फ्लॅटचा ताबा न देता तसेच या फ्लॅटवर सेवा विकास बँकेकडून तब्बल १२ कोटी रुपयांचे कर्ज काढून सर्व फ्लॅट गहाण ठेवून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरसेवक निलेश बारणे यांच्यासह समर्थ लँडमार्क कंपनीचे भागीदार आणि सेवा विकास बँकेचे संचालक मंडळ व अधिकाऱ्यांविरोधात वाकड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निलेश बारणे हे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुतणे आहेत. निलेश हिरामण बारणे, महेश हिरामण बारणे अविनाश लाला बारणे अशी गुन्हा दाखल झालेल्या समर्थ लँडमार्क कंपनीच्या भागीदार यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रितेश प्रकाश दुगड (वय ४९, रा. आदित्य रेसिडन्सी, मित्रमंडळ चौक, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुगड यांना फ्लॅट घ्यायचा असल्याने त्यांनी २०१३ साली मित्र धिरज अशोक खिंवसरा (रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांच्या ओळखीने अविनाश बारणे व महेश बारणे यांची भेट घेतली. समर्थ लँडमार्क या भागीदारी संस्थेकडून थेरगाव येथे शांताई पार्क हा नियोजित गृहप्रकल्प सुरू होता. तेथील फ्लॅट क्र. ५०४ व ५०५ दुगड यांना आवडले. त्यांनी पत्नीच्या नावे ५०४ क्रमांकाचा आणि स्वतःच्या नावे ५०५ क्रमांकाचा फ्लॅट बुक केला. या फ्लॅटची किंमत अनुक्रमे ३० लाख रुपये आणि २० लाख ८७ हजार रुपये ठरली होती. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे त्यांनी ५० लाख ८७ हजार रुपये भरले. तसेच स्टॅम्प ड्युटी व रजिस्टेशन फी अशी २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम समर्थ लँडमार्कचे भागीदार यांनी सांगितलेल्या एजन्सीच्या बँक खात्यावर पाठविली. वाचा: समर्थ लँडमार्कच्या भागीदारांनी दोन्ही फ्लॅट दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करून खरेदीखत करून दिले. खरेदीखत करून दिलेले असतानाही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. अविनाश बारणे, निलेश बारणे, महेश बारणे, विजय बारणे यांनी या गृह प्रकल्पात बांधण्यात येणारे सर्व फ्लॅट दि सेवा विकास को-ऑप बँक लि. पिंपरी या बँकेच्या भोसरी शाखेकडे गहाण ठेवलेले असल्याची माहिती दुगड यांना मिळाली. त्याचे गहाणखत दुय्यम निबंधक कार्यालय हवेली १८ येथे नोंदवून एकूण १२ कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. फ्लॅट विक्री करताना मात्र त्यावर कोणताही बोजा नसल्याचे आरोपींनी खोटे सांगितले होते. फ्लॅटचा ताबा देण्याबाबत वारंवार संपर्क साधला असता अरेरावीची भाषा वापरून 'मी तुम्हाला ताबा देत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. मी मोठा पॉलिटिकल माणूस आहे. तुम्ही माझे काही करू शकत नाही,' अशी धमकी दिल्याचे दुगड यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. वाचा: विशेष म्हणजे अविनाश बारणे यांनी दुगड यांच्या विरुद्ध दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोव्हेंबर महिन्यात दाखल केला आहे. खरेदी केलेल्या फ्लॅटवर कर्ज कसे काढले अशी विचारणा करीत त्यांनी दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. दुगड यांनी रेराकडे तक्रार दाखल केली होती. रेरा मध्ये या फ्लॅटचा ताबा आणि दोन्ही फ्लॅटचे प्रत्येकी दहा लाख रुपये असे एकूण २० लाख रुपये दुगड यांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार बारणे यांनी १५ लाख रुपये दुगड यांना चेकने दिले. उर्वरित पाच लाख रुपयांचा चेक न वाटल्याने दुगड यांनी न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी दुगड यांनी वारंवार बारणे यांच्याकडे दीड कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटलेले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर म्हणाले, दोन्ही तक्रारदारांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केले आहेत. त्यानुसार वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ddUbuS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.