Type Here to Get Search Results !

ओमिक्रॉनवर लस किती प्रभावी?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

जालनाः महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकात ओमिक्रॉनचे (Omicron)दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं आरोग्ययंत्रणा संतर्क झाली आहे. महाराष्ट्रातही एकूण २८ ओमिक्रॉन संशयित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनेही ओमिक्रॉनबाबत सावध पावलं उचलली आहेत. आरोग्यमंत्री (Rajesh Tope) यांनी राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन केलं आहे. तसंच, ओमिक्रॉन व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे. याचीही माहिती त्यांनी दिली आहे. ओमिक्रॉच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. जवळपास ७५० ते ८०० जणांची चाचणी करण्यात आली आहे. या तपासणीत ३ जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यांचा अहलाव जीनोमिक सिक्वेंसिंगसाठी दिला असून तो अहवाल आल्यावरच चित्र स्पष्ट होईल.१ नोव्हेंबरपासून आतापर्यंत या बाधित देशातून आलेल्या लोकांचाही शोध घेणं सुरू असून त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीतून २८ अहवाल जिनोमिक सिकवेन्सिंगसाठी पाठवले आहेत. यातील १२ अहवाल हे मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालय तर १६ सँपल हे एनआयव्हीच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. वाचाः कर्नाटकातील परिस्थितीवर मी भारत सरकारचे आरोग्य विभागाचे सचिन राजेश भूषण यांच्याशी बोललो असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पेशंट बाधित असून त्यापैकी एक चांगल्या स्थितीत आहे तर एक रुग्णालयात दाखल आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. जवळपास ३० पेक्षा अधिक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत आहे. याचा संसर्गाचा वेगही जास्त असला तरी कुणी गंभीर आजारी नसून ऑक्सिजन किंवा इतर त्रास नाही व मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. ही जमेची बाजू आहे, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. वाचाः या विषाणूची संसर्गाची क्षमता खूप जास्त असल्याने लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे .कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी या व्हेरियंटवर उपयुक्त असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. अँटिबॉडीजना हा करोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत त्यामुळं म्हणून सर्वांनी लसीकरण करू घेण्याचे विनंती वजा आवाहन देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G7o0K0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.