Type Here to Get Search Results !

एटीएम फोडण्यासाठी जिलेटिनचा वापर? संगमनेरमध्ये प्रचंड खळबळ

शिर्डी / : जिल्ह्यातील तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. येथील समनापूर येथे चोरट्यांनी एटीएम फोडून चार लाखांहून अधिक रोकड लंपास केल्याचं समोर आलं आहे. जिलेटिनचा स्फोट करून हे एटीएम फोडल्याचा संशय असून त्यामुळं तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Burglars make blast at atm in Ahmednagar) समनापूर बाजारपेठेत पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. इंडिया नंबर वन कंपनीच्या एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केलं. सकाळी स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली. पोलिसांना घटनास्थळी एटीएमचे अक्षरशः तुकडे झालेले आढळून आले. काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह श्वान पथक व फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असून अद्याप कुठलेही धागेदोरे हाती लागले नाहीत. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वाचा: लोणीची पुनरावृत्ती दोन महिन्यांपूर्वी १० ऑक्टोबर रोजी राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे श्रीरामपूर-संगमनेर रोडवरच वेताळबाबा चौकात असणारे एटीएम चोरट्यांनी अशाच पद्धतीने जिलेटिनचा स्फोट करून फोडले होते. विशेष म्हणजे हे एटीएम देखील पहाटे तीन वाजेच्या दरम्यान फोडण्यात आले होते. तर, ४ लाख ५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसतानाच २० किलोमीटर अंतरावर संगमनेर तालुक्यात लोणीची पुनरावृत्ती झाली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pt8wcA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.