Type Here to Get Search Results !

मराठवाड्यात करोनाचा धोका वाढला, ४१ रुग्ण पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : करोना या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे राज्यात आधीच चिंतेचं वातावरण आहे. यावर चिंता करण्याची सोडून काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशात गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात करोना विषाणू (कोविड-१९) साथीचे ४१ नवीन रुग्ण आढळून आले असून यादरम्यान या साथीच्या आजारामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी यासंबंधी माहिती दिली. (corona cases in Marathwada 41 patients were positive and two died) मराठवाड्यातील आठ जिल्हा मुख्यालयातून मिळालेल्या अहवालानुसार, औरंगाबाद जिल्ह्यात करोनाचा धोका जास्त आहे. इथं १७ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीत दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, लातूरमध्ये सात, जालना आणि बीडमध्ये प्रत्येकी पाच, परभणी आणि नांदेडमध्ये प्रत्येकी तीन आणि उस्मानाबादमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. या दरम्यान हिंगोलीत एकही प्रकरण समोर आलेले नाही. खरंतर, गेल्या आठवडम्यामध्ये राज्यात करोनाचा आकडा कमी होता. पण आता अचानक रुग्ण वाढल्याने काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी योग्य ती खबरदारीही आता पालिकेकडून घेण्यात येणार आहे. इतकंच नाहीतर काही ठिकाणी लसीकरण आणि निर्बंधही घालण्यात येण्याची शक्यता आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मध्यंतरीचा काही कालावधी वगळता शहरात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबविणे सुरू झाले, त्याला औरंगाबादकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याने औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत गेला. पण आता पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत नव्याने सापडलेल्या ओमायक्रॉन विषाणूमुळे जगाची चिंता वाढवली आहे. गुरुवारी भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली. मात्र शुक्रवारी करोना रुग्णांच्या अहवालानंतर अत्यंत दिलासाजनक बातमी समोर आली. शुक्रवारी औरंगाबाद शहरात १४२३ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या, गुरुवारी ४७९ आरटीपीसीआर चाचण्या गेल्या होत्या, त्यापैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे औरंगाबाद शहरवासियांनी तब्बल २० महिन्यानंतर दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात शुक्रवारी तीन करोनाबाधितांची भर पडली. (corona cases in Marathwada 41 patients were positive and two died) (corona cases in Marathwada 41 patients were positive and two died)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dqhiTg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.