Type Here to Get Search Results !

'पांडू'च्या कलाकारांकडून करोनाचा नियमभंग; सेलिब्रेटी, आयोजकांवर गुन्हा दाखल होणार का?

ठाणे: एका चित्रपटाच्या शोसाठी आलेल्या सेलिब्रिटींनी आनंदोत्सव साजरा करत भर गर्दीत विनामस्क डान्स करतानाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र विनामस्क फिरणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकावर कारवाई करत प्रशासनाकडून दंड आकारणी केली जाते. मग या सेलिब्रिटींवर कारवाई होणार का? असा सवाल आरपीआय एकतावादीचे युवध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे यांनी उपस्थित केला आहे. (pandu marathi movie rpi demands prosecution of actors and organizers for violating corona rules) कोरोना काळात निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले होते मात्र नंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी मास्क वापराने बंद केले. सध्या ओमिक्रॉनचे संक्रमण वाढत चालले आहे. त्याचबरोबर काही नागरिक परदेशातून पुन्हा परतले आहे. त्यामुळे ओमयक्रोनचा संसर्ग झपाट्याने वाढू शकतो. त्यासाठी प्रशासनाकडून आता मास्क न वापरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड आकारणी केली जात आहे. परंतु, नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाण्यातील विवीयाना मॉल येथे चित्रपटाच्या शोसाठी आलेल्या काही कलाकारांनी चित्रपटाचा आनंद साजरा करत गर्दीत डान्स केला. यावेळी सोशल डिस्टनसिंग चे उल्लंघन झाले. तसेच या वेळी अनेकांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते. नियमांचे भंग करणार्‍या सामान्य नागरिकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. मात्र, सेलिब्रेटींसाठी वेगळा नियम आहे का? असा सवाल उपस्थित करत या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी आरपीआय एकतावादीचे युवाध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी पांडू या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनिस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रीके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रेटींने मास्क अथवा देहदुरीच्या (सोशल डिस्टन्स) नियमांचे पालन केले नाही. अस भैय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितलं आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ds9r7n

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.