Type Here to Get Search Results !

ओमिक्रॉनला वेळेत थांबवू शकलो नाही तर...; आरोग्यमंत्र्यांनी दिली धोक्याची सूचना

म. टा. प्रतिनिधी, परभणीः राज्याने डेल्टा व्हेरियंटवर (delta variant)जवळजवळ मात केली असून जर वेळीच आपण ओमिक्रॉन या व्हेरियंटला (omicron symptoms) थांबू शकलो नाही. तर आपल्याला मोठ्या संसर्गाला सामोरे जावं लागू शकते, असा गंभीर इशारा राज्याचे आरोग्यमंत्री ()यांनी केलं आहे. जगभरात ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर महाराष्ट्रानेही सावधगिरी बाळगत प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता अखेर राज्यात पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाचं निदान झालं आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा करोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याचं प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्यययंत्रणा सावध झाली असून तातडीने पावलं उचलली आहेत. आज राजेश टोपे हे खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी परभणीत आले होते. त्यावेळेस त्यांनी ओमिक्रॉन व्हेरिंयटबाबत भाष्य केलं आहे. वाचाः 'ओमिक्रॉन या व्हेरियंटचा प्रसार खूप जलद गतीने होत असून दक्षिण आफ्रिकेत डेल्टा रिप्लेस करण्याचे काम या व्हेरियंटने केलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोविड नियमांचे पालन करण्याची सूचना यावेळी राजेश टोपे यांनी केली आहे. लसीकरणासाठी परभणीला आणखीन वेग वाढवावा लागणार आहे. राज्यात ८५ टक्के लोकांचे लसीकरण झालेलं आहे. मात्र परभणीत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ७१ टक्के आहे. त्यामुळे परभणीकरांना लसीकरण करून घेणे गरजेचं असल्याचा यावेळी त्यांनी नमूद केलं. वाचाः दरम्यान, ओमायक्रॉन बाबत दक्षिण आफ्रिकेतून माहिती घेतली जात आहे. रुग्णांवर किती परिणाम होतो, उपचार आणि इतर बाबींची माहिती घेतली जात आहे. पूर्ण माहिती मिळाल्यावर आयसीएमआर त्याबाबत प्रोटोकॉल निश्चित करेल. त्यानंतरच त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ज्यांनी कोविड लस घेतली नाही, त्यांनी पहिली लस घ्यावी. पहिली घेतली असेल तर दुसरी मात्रा द्यावी, असे आवाहन टोपे यांनी केले होते. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31u7p43

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.