Type Here to Get Search Results !

खासदार, आमदारांनी राज्याची चिंता वाढवली; कबड्डी स्पर्धेत शेकडो लोकांचा डिजे लावून धिंगाणा

चंद्रपूर : ओमिक्रानचा धोका लक्षात घेता सरकार, प्रशासन अलर्ट आहे. महाराष्ट्रात ओमिक्रानचे रूग्ण आढळल्याने राज्यावर चिंतेचे ढग पसरले आहेत. मात्र, चंद्रपूरातील खासदार, आमदार दापत्यांना याचा विसर पडला आहे, असं दिसतं. कब्बडी सामन्यांच्या निमित्ताने रविवारला शेकडो लोक एकत्र आले. यावेळी एकाच्याही तोंडावर मास्क नव्हतं. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे संसर्गजन्य रोगांमध्ये वाढ होऊ शकते. यावेळी सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे रात्री एक वाजेपर्यंत डिजे लावून धिंगाना सुरू होता. हा सारा धिंगाणा खासदार, आमदार महोदयांचा डोळ्यादेखत सूरु होता. तरीही आमदार चषक स्पर्धा सूरू होती. कब्बडीच्या मैदानातच हा प्रकार घडल्यामुळे मोठा गर्दी झाली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यात १४४ कलम लागू असताना डिजेची परवानगी मिळाली कशी ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, करोना या जीवघेण्या संसर्गाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे राज्यात आधीच चिंतेचं वातावरण आहे. यावर चिंता करण्याची सोडून काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अशात गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात करोना विषाणू (कोविड-१९) साथीचे ४१ नवीन रुग्ण आढळून आले असून यादरम्यान या साथीच्या आजारामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी यासंबंधी माहिती दिली. मराठवाड्यातील आठ जिल्हा मुख्यालयातून मिळालेल्या अहवालानुसार, औरंगाबाद जिल्ह्यात करोनाचा धोका जास्त आहे. इथं १७ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीत दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, लातूरमध्ये सात, जालना आणि बीडमध्ये प्रत्येकी पाच, परभणी आणि नांदेडमध्ये प्रत्येकी तीन आणि उस्मानाबादमध्ये करोनाचे रुग्ण सापडले आहेत. या दरम्यान हिंगोलीत एकही प्रकरण समोर आलेले नाही.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dpwJLm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.