Type Here to Get Search Results !

पुण्यात खळबळ! काँग्रेस कार्यकर्त्याचा भर दिवसा गोळ्या घालून खून

नुपूर पाटील । काँग्रेस कार्यकर्त्याचा भर दिवसा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौक येथे घडली आहे. समीर मनूर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असता दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यात समीरचा जागीच मृत्यू झाला. समीर मनूर यांची काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dnLlLm

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.