Type Here to Get Search Results !

धक्कादायक! शेतकऱ्याचा पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, कारण वाचून जिल्ह्यात खळबळ

औरंगाबाद : रब्बीच्या हंगामात थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणकडून शेतकऱ्यांची सरसकट वीज कनेक्शन कट केली जात आहे. महावितरणाच्या या सुलतानी कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात रोहित्र सुरू करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकऱ्यांकडे थकीत बिल बाकी असल्याच्या कारणावरून फुलंब्रीसह तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची वीज बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वीज बंद करतांना थेट रोहित्रवरील मेन लाईन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकाचवेळी सर्वच शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद झाला आहे. सोबतच शेत वस्तीवरील वीज सुद्धा बंद झाली आहे. तर विनंती करूनही महावितरणाकडून वीज पुरवठा सुरू केला जात नसल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने फुलंब्रीच्या महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू असतानाच शेख शाकिर नावाच्या शेतकऱ्यांने अचानक अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तर याचवेळी वसंत पाथ्रीकर नावाच्या शेतकऱ्यांने खिशातील विषाची बाटली काढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनास्थळी बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आणि वीज सुरू झाली... महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेलं आंदोलन आणि शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहता महावितरण विभागाने नारमाईची भूमिका घेत बंद केलेले रोहित्र पुन्हा सुरू केले. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकांना जीवनदान देता आले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lyhTXq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.