Type Here to Get Search Results !

'मंत्रिमंडळातील शेतकऱ्यांची पोरंच बांधावर जाऊन वीज तोडत आहेत'

अहमदनगर: ‘ सरकारच्या मंत्रिमंडळात बसलेले मंत्री आम्‍ही शेतकऱ्यांची मुले असल्‍याचे सांगतात. छाती पुढे काढून मोफत वीज देण्‍याची भाषा करतात. परंतु आता तेच लोक बांधावर जाऊन थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. राहाता तालुक्यात एका कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. 'राज्‍यात सरकार नावाची कोणतीही व्‍यवस्‍था सध्‍या दिसत नाही. महाविकास आघाडी सरकार सत्‍तेवर आल्‍यापासून कोणताही समाज घटक समाधानी नाही. करोना संकटातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारने दिलेल्‍या मदतीमुळेच सामान्‍य माणसाला दिलासा मिळाला. राज्‍य सरकारची कवडीचीही मदत या संकटात झाली नाही. राज्‍य सरकार फक्‍त केंद्राकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहे. नैसर्गिक आपत्‍तीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. सरकार फक्‍त घोषणा करते. शेतकऱ्यांच्या पदरात दमडीचीही मदत मिळू शकलेली नाही. पीक विमा कंपन्‍या शेतकऱ्यांना फसवत राहिल्‍या तरी सरकार ढिम्‍म होऊन पाहत बसले. सरकार नावाची व्‍यवस्‍थाच राज्‍यात अस्तित्‍वात राहिली नसल्‍याने विकासाची प्रक्रिया ठप्‍प झाली,' असे विखे पाटील म्हणाले. वाचा: 'मंत्रिमंडळात बसलेली आम्‍ही शेतकऱ्यांची मुले आहोत असे सांगणारेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वीज कनेक्‍शन कट करीत आहेत. १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्‍याची आश्‍वासने उर्जामंत्र्यांनीच दिले होते. त्‍याचे काय झाले? एसटी कर्मचारी आत्‍महत्‍या करीत आहेत. सरकार मधील मंत्री आणि नेते मात्र नाचगाण्‍यात दंग आहेत. मागील दोन वर्षांपासून सरकारकडे आपण शिवार रस्‍त्‍यांसाठी निधी उपलब्‍ध करून देण्‍याची मागणी करत आहोत. मात्र सरकार विकास कामांना पैसे देत नाही. विरोधी आमदारांना निधीच द्यायचा नाही, हा नवीन फंडा आता महाविकास आघाडी सरकारने पुढे आणला आहे. मात्र तरीही शिवार रस्‍त्‍यांच्‍या कामासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहील, असेही विखे पाटील म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xPD0cE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.