Type Here to Get Search Results !

चिंता वाढतेच आहे! दुबईहून कल्याणमध्ये आलेल्या आणखी दोघांचे रिपोर्ट आले

कल्याण: दुबई येथून येथे आलेले आणखी दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने कल्याण डोंबिवलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या दोघांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला आहे का याची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्ससिंगसाठी पाठवले जाणार आहेत. ही माहिती डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. (tension increased two who came to from dubai tested positive) दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरुणाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यात नायजेरिया, रशिया आणि नेपाळमधून आलेले सहा जण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने अधिकच चिंता वाढली. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर नायजेरियातून आलेल्या कुटुंबाच्या संपर्कातील चार जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंता वाढली असताना आता कल्याणमधील दुबईहून आलेल्या दोघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने धाकधूक आणखी वाढली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात गेल्या १० दिवसांमध्ये परदेशातून तब्बल २९५ नागरिक आलेले आहेत. तर राज्य शासनाने जे देश हाय रिस्क म्हणून जाहीर केले आहेत, अशा देशांतून आतापर्यंत शहरात ७१ नागरिक आले आहेत, तर हाय रिस्क देशातून एक नागरिक आला आहे. मात्र, परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी १०९ जणांचा संपर्क अजूनही संपर्क होत नाही आहे. यामुळे चिंतेत भर पडली आहे. क्लिक करा आणि वाचा- प्रशासनाकडून आतापर्यंत यांपैकी ८८ नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. यातील ४८ नागरिकांचे अहवाल यायचे बाकी आहेत. यांपैकी एकूण ३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अजूनही १०९ जणांचा संपर्क होत नसल्याने प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GaR1Vg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.