Type Here to Get Search Results !

तरुणांनी शिवीगाळ केली म्हणून घरातून बाहेर आला आणि घात झाला; हल्ल्यात मृत्यू!

जळगाव : पू्र्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत चॉपर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार घेताना सोमवारी मृत्यू झाला आहे. जळगावातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. () या हाणामारीत मृत तरुणाविरोधातही गुन्हा दाखल झाला. पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे (वय २४, रा. आदित्य चौक) असं मृत तरुणाचं नाव आहे. हल्लेखोर सागर पूनम कंडारे व विशाल विजय सपकाळे (दोघे रा. सिद्धार्थनगर) या दोघांची सोमवारी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या पवन सोनवणे, सागर कंडारे व विशाल सपकाळे या तिघांमध्ये वैर होते. यांच्यात परिसरातील वर्चस्वाच्या वादातून कायम वाद होत असत. शनिवारी रात्री अमोल चौधरी नावाच्या तरुणाशी सागर, विशालचे भांडण झाले. हा वाद सुरू असताना सागर व विशाल यांनी पवनच्या घराजवळ येऊन दमदाटी, शिवीगाळ केली. त्याचवेळी घरातून बाहेर आलेल्या पवन याची देखील त्यांच्याशी झटापट झाली. या हाणामारीत विशालने पवनला पकडून ठेवले व सागरने त्याच्यावर चॉपरने वार केले. यात पवन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, घटनेनतंर मारेकरी विशाल व सागर यांस पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. दरम्यान, सोमवारी पहाटे पवनचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. दुपारी दोन वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी दुपारी पवनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत पवनच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ व एक विवाहित बहिण असा परिवार आहे. पवनच्या मृत्यूनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त वाढवून गर्दी नियंत्रणात आणली. तसंच पवनवर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विशाल व सागर या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृत पवनसह त्याच्या भावावरही गुन्हा हाणामारीत पवनने देखील सागर व विशाल यांना लाकडी दांड्याने मारहाण केली होती. तसेच पवनचे भाऊ प्रतिक व बाळा या दोघांनी दगडफेक केली होती. याबाबत संशयित विशालने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत पवन याच्यासह प्रतिक व बाळा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EzvVzq

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.