Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड; कोणाची लागणी वर्णी? जाणून घ्या...

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा बँकांवरील राष्ट्रवादीचा दबदबा यावेळीही कायम राहिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं अध्यक्षपद () राष्ट्रवादीकडे राहिलं असून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या निवडीने २५ वर्षांनंतर शिराळा या डोंगरी तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली, तर काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांच्या रूपाने जिल्हा बँकेत पहिल्यांदाच महिलांना उपाध्यक्ष पद मिळालं आहे. मावळते अध्यक्ष दिलीप पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही. दिलीप पाटील हे पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. गेल्या वेळी दिलीप पाटील हे अध्यक्ष असताना, संचालक मंडळात मानसिंगराव नाईक हे संचालक होते. दरम्यान, मानसिंगराव नाईक यांनी त्यावेळी कारभाराबाबत आक्षेप घेऊन शासनस्तरावर तक्रारी केल्या होत्या. आता चांगला कारभार करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असं नूतन अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DyQaM9

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.