Type Here to Get Search Results !

शिवेंद्रराजेंचा डाव फसला! सातारा बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात

सचिन जाधव । सातारा सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद () पटकावण्याचा भाजपचे आमदार () यांचा डाव अखेर फसला आहे. शरद पवार व अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनी केलेली मोर्चेबांधणी निष्फळ ठरली आहे. बँकेच्या निवडणुकीत आमदार () यांचा झालेला पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधामुळं शिवेंद्रराजेंचं अध्यक्षपद हुकल्याचं बोललं जात आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. मात्र, जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार यावर बरेच दिवस खलबतं सुरू होती. अध्यक्षपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही अध्यक्षपदासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत वेगळाच निर्णय झाला. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, नितीनकाका पाटील, प्रभाकर घार्गे उपस्थित होते. या बैठकीत यांच्या नावावर मोहोर उठवण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांंच्या नावावर सहमती झाली. नितीन पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. वाचा: सुरुवातीपासूनच अध्यक्षपदासाठी शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाला विरोध होत होता. शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र जिल्ह्यातून व राष्ट्रवादीमधूनच असलेला विरोध यामुळे शरद पवार यांचा नाईलाज झाला. शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावरच पुढील निर्णयाची जबाबदारी सोपवली. रामराजेंनी शिवेंद्रराजेंची मनधरणी करत राष्ट्रवादीचाच संचालक अध्यक्ष बनवण्यात यश मिळवले. अध्यक्षपदासाठी नितीन जाधव पाटील आणि उपाध्यक्षपासाठी अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, शशिकांत शिंदेंचा एका मतानं झालेला पराभव आणि आमदार मकरंद पाटील यांच्या विरोध शिवेंद्रराजेंसाठी अडचणीचा ठरल्याचं बोललं जात आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ps6NEt

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.