Type Here to Get Search Results !

chaityabhoomi: अभिवादनासाठी चैत्यभूमी स्मारकात जाताना गोंधळ, वाद; त्यानंतर...

मुंबई: आज , अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर( Bharat Ratna ) यांचा महापरिनिर्वाण दिन. चैत्यभूमीसह (Chaityabhoomi) देशातील विविध भागांमध्ये महामानवाला अभिवादन करण्यात येत आहे. चैत्यभूमीवर देखील भीम अनुयायांची रीघ लागली आहे. अनुयायी रांगेद्वारे आत जात बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. मात्र, रांगेतून आत सोडण्याच्या प्रक्रियेवरून वाद निर्माण झाल्याने दोन गटांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर लगेचच तणाव निवळला. (while going to pay tribute to bharat ratna dr babasaheb ambedkar at chaityabhoomi the dispute erupted but the tension subside soon) क्लिक करा आणि वाचा- बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मारकात जात असताना काही जणांना अडवण्यात आलं. इथे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अभिवादनासाठी स्मारकात जात असताना अडवलं गेल्यानं काहीसा गोंधळ निर्माण झाला. आमच्याच वेळेला नियम आणि गाईडलाइन्स का दिल्या जातात, असे सवाल हे अनुयायी पोलिसांना विचारत होते. इथे काही जणांनाच प्रवेश दिला जातो, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. आम्ही शांततेत अभिवादनासाठी स्मारकात जात असतानाही आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचीही काहींनी तक्रार केली आहे. क्लिक करा आणि वाचा- हा गोंधळ वाढत गेल्याने पोलिसांनी गेट बंद केला आणि अनुयायांना तेथून बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी पोलिस आणि उपस्थित अनुयायांमध्ये बाचाबाची आणि काहीशी झटापट झाली. मात्र, स्वत: आनंदराज आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्यानंतर हा तणाव तत्काळ निवळला. क्लिक करा आणि वाचा- दलित पँथरचे अध्यक्ष दीपक केदारेंना अटक दरम्यान, ऑल इंडिया दलित पँथरचे अध्यक्ष दीपक केदारे यांना अटक करण्यात आली. चैत्यभूमीवर स्मारकात गर्दी करून बळजबरीने शिरण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या घटनेचा निषेध करत ऑल इंडिया दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन परिसरात निदर्शने केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31yGzrJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.