Type Here to Get Search Results !

Akola Legislative Council elections : अकोला विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू, भाजप-शिवसेनेत लढत रंगणार

अकोला : अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी आज मतदान होणार असून यात ८२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात महाविकास आघाडीकडून गोपीकिशन बाजोरिया आणि भारतीय जनता पक्षाकडून वसंत खंडेलवाल हे दोन उमेदवार रिंगणात उभे असून या दोघांमध्ये लढत होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज आहे. दरम्यान, सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नेमका विधानपरिषदेचा गुलाल हा कोणाच्या खांद्यावर पडणार आहे ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. अकोला निवडणूक अकोला जिल्हा परिषदमधले ६० सदस्य अकोला महानगरपालिकेतले ८१ नगरसेवक अकोट नगर परिषदचे ३६ सदस्य तेल्हारा नगरपरिषदचे १९ सदस्य बाळापुर नगर परिषदचे २६ सदस्य पातूर नगर परिषदचे १९ सदस्य मुर्तीजापुर नगर परिषदचे २६ सदस्य बार्शिटाकळी नगरपरिषदचे २० असे एकूण १४० सदस्य यात मतदान करणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील निवडणुका वाशिम जिल्हा परिषदेचे ५८ सदस्य वाशिम नगर परिषदचे ३४ सदस्य कारंजा नगर परिषदचे ३२ सदस्य मंगळापूर नगरपरिषदेचे २१ सदस्य रिसोड नगरपरिषदचे २३ सदस्य असे एकूण ११० सदस्य आज मतदान करणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील निवडणुका बुलढाणा नगर परिषदमधील २१ सदस्य चिखली नगर परिषदमधील ३० सदस्य देऊळगाव राजा नगर परिषदमधील २१ सदस्य सिंदखेड नगर परिषदमधील १९ सदस्य लोणार नगरपरिषदमधील २० सदस्य मेहकर नगर परिषदमधील २७ सदस्य खामगाव नगर पालिकामधील ३७ सदस्य शेगाव नगर पालिकेतील ३२ सदस्य जळगाव जामोद नगरपरिषदेचे २१ सदस्य नांदुरा नगरपालिकाचे २६ सदस्य मलकापूर नगरपरिषदचे ३२ सदस्य अशा एकूण अकरा नगरपरिषदेचे २९६ नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारांना नाही मतदानाचा अधिकार.... विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. यामध्ये स्थानीक स्वराज्य संस्थेचे सदस्य नसल्याने यात उमेदवारांना मतदानाचा अधिकार नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार आज मतदान करू शकणार नाहीत. जर यातील एकही उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य असता तर त्याला मतदानाचा अधिकार मिळाला असता. ही पहिली निवडणूक आहे ज्यात उमेदवारालाच मतदान करता येणार नाही.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31HEvOp

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.