Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: एनसीबी SITने त्या तीन प्रकरणांचा तपास सोडला; दिले हे कारण

मुंबई: ड्रग्ज पार्टी प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा तपास एसआयटीकडे देण्यात आला होता. मात्र, आता यातील फक्त तीनच प्रकरणांचा तपास करण्याचा निर्णय एनसीबी एसआयटीने घेतल्याचे वृत्त आहे. त्यामागचे कारणही एसआयटीकडून देण्यात आले आहे. ( ) वाचा: एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडील सहा प्रकरणांचा तपास एनसीबी महासंचालकांनी एसआयटीकडे वर्ग केला होता. एनसीबीचे उपमहासंचालक यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील अधिकाऱ्यांची टीम या प्रकरणांचा नव्याने तपास करत आहे. ही टीम सध्या मुंबईत असून एकेक प्रकरण हाती घेऊन त्याची पडताळणी करण्यात येत आहे. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाचा: एनसीबी एसआयटीने सहा पैकी तीन प्रकरणांचा तपास सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ तीनच प्रकरणांचा तपास आता एसआयटी करणार आहे. त्यात , मंत्री यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरण आणि अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणाचा समावेश आहे. याबाबत एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. 'एसआयटी आता केवळ तीन प्रकरणांचा तपास करणार आहे. एसआयटीकडे मुंबईतील एकूण सहा प्रकरणे दिली गेली होती. त्यातील तीन प्रकरणांत कोणतेही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आढळून आलेले नाही. त्यामुळे ही प्रकरणे एसआयटीने सोडली आहेत. त्यात मुंब्रा येथील एमडी ड्रग्ज प्रकरण, जोगेश्वरी येथील चरस प्रकरण आणि डोंगरी येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा समावेश असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. वाचा: दरम्यान, एनसीबी एसआयटीने तीन प्रकरणांचा तपास थांबवल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. खरंतर एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या धाडसत्रांशी संबंधित २६ प्रकरणे बोगस आहेत. त्या सर्वांची एसआयटीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. असे असताना ६ प्रकरणांमधली तीन प्रकरणे एसआयटीने सोडली असतील तर त्यामागचे कारण स्पष्ट झाले पाहिजे, असे मलिक म्हणाले. उरलेल्या तीन प्रकरणांत आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा दावा केला जात असल्याबद्दलही मलिक यांनी आक्षेप घेतला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nhpRFo

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.