Type Here to Get Search Results !

धक्कादायक! माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सायबर चोरांच्या जाळ्यात; केवायसी अपडेटच्या बहाण्याने फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई भारताचा माजी क्रिकेटपटू सायबर चोरांच्या जाळ्यात अडकला आहे. करण्याच्या बहाण्याने कांबळी याच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी १ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविले. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (former indian cricketer has been cheated by under the pretext of updating his kyc) विनोद कांबळीच्या मोबाइलवर ३ डिंसेबर रोजी एका व्यक्तीने फोन केला. त्याने कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याचे केवायसी अपडेट नसल्याची माहिती त्याने दिली. केवायसी अपडेट न केल्यास खात्यामधील व्यवहार बंद होतील असे त्याने सांगितली. त्यामुळे कांबळी याने ऑनलाइन केवायसी अपडेट करण्याची तयारी दर्शवली. क्लिक करा आणि वाचा- बँकेच्या प्रतिनिधीने कांबळी याच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवरील जाऊन अँप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी देण्यास सांगितले. कांबळी याने ओटीपी देताच त्याच्या मोबाइलचा ताबा (एक्सेस) या प्रतिनिधीने मिळवला आणि त्याच्या बँक खात्यावरून १ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविले. याबाबत विचारणा करताच समोरील व्यक्तीने कांबळीसोबतचा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळी याने वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक पुरावे, बँक तपशील आणि मोबाइल क्रमांकावरून आरोपींचा शोध सुरु केला आहे. यासाठी सायबर पोलिसांची देखील मदत घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dzkbkH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.