Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री कार्यालयात पुन्हा करोनाचा शिरकाव; अधिकारी रुग्णालयात दाखल

मुंबई: आणि वर्षा निवासस्थानात पुन्हा एकदा विषाणूने शिरकाव केल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना करोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( ) वाचा: राज्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. गेल्या महिनाभरापासून मात्र स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून करोनाची लाट ओसरल्याचे चित्र आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट पाहायला मिळत आहे. हे सकारात्मक चित्र दिसत असतानाच मुख्यमंत्री कार्यालय व वर्षा निवासस्थान येथून थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या दोन्ही ठिकाणी वावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या काळजीत भर पडली आहे. त्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच तातडीने उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर आवश्यक असलेली पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. वाचा: मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची कोविड चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय दोन्ही ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे सध्या मानेच्या दुखण्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाली असून त्यांना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री कार्यालय व वर्षा निवासस्थानी करोनाचा धोका निर्माण झाल्यानंतर ठाकरे कुटुंबालाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी याआधी मार्च माहिन्यात करोनाने शिरकाव केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर पर्यावरण मंत्री यांनाही करोनाचा सामना करावा लागला होता. या दोघांनीही उपचारांनंतर करोनावर मात केली होती. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30oo2hd

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.