Type Here to Get Search Results !

भाजपच्या सत्ताकाळात 'आयडिया ऑफ इंडिया' धोक्यात!; 'या' नेत्याचा आरोप

सेवाग्राम: समजून घेतली आणि काँग्रेसचा विचार शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवला, तळागाळातील लोकांशी नाळ तुटू दिली नाही तर आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही. भारतीय जनता पक्ष सरकार चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महागाई गगनाला भिडली असून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागरण करा. देशात धर्माच्या नावाने विभाजनाचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. भाजपच्या सत्ताकाळात ' ' धोक्यात आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ( ) वाचा: सेवाग्राम येथे प्रशिक्षण शिबीराच्या समारोपीय भाषणात वेणुगोपाल बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जो मार्ग आम्ही भारतासाठी तयार केला त्यावर चालणे आपणच बंद केले आहे. आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वातंत्र्याची लढाई लढली नाही. आपण कोण आहोत याचा आपल्याला विसर पडला आहे. सेवाग्राम या नावातच लोकांची सेवा आहे. लोकांशी नाळ तुटल्याने निवडणुकीत पराभव होत आहे. त्यासाठी बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. झोकून देऊन काम केल्याशिवाय पक्ष संघटन वाढणार नाही. समता, बंधुता हा काँग्रेसचा विचार आहे. तो विचार लोकांपर्यंत पोहचवा. भाजप व आरएसएस यांना घाबरते म्हणून ते सातत्याने त्यांच्या बदनामीची मोहीम चालवतात. त्यांना माहिती आहे राहुल गांधी हे काँग्रेसची ताकद आहेत म्हणून ते दररोज त्यांच्या बदनामीची मोहीम चालवतात. नेहरू-गांधी कुटुंबाने कधीही जाती-धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही, सर्वांना समान सन्मान दिला, असेही वेणुगोपाल म्हणाले. वाचा: या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नेतृत्व तयार करणे, नेतृत्व आणि जनता यामधील दरी भरून काढण्याचे काम होणार आहे. काँग्रेस संघटना पुन्हा मजबूत करण्यात असे प्रशिक्षण कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावणार आहेत, असा विश्वास वेणुगोपाल यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, आपण सर्व नशीबवान आहात की महात्मा गांधी जिथे राहिले त्या भूमीत राहून तुम्हाला त्यांचे विचार जगता आले. प्रभात फेरीत सर्व जातीधर्म भेदभाव विसरून लोक एकत्र येतात आता पुन्हा एकदा प्रभातफेरीचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. मानवी गरजांसोबतच मानवी हक्कांची लढाई महत्त्वाची आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज रहावे. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतिहासाची मोडतोड करून स्वातंत्र्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप व आरएसएसकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. प्रशिक्षणातून घेतलेला विचार गावखेड्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. विचारांची लढाई ही अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी तुमच्यासारख्या प्रशिक्षीत लोकांची गरज आहे. सेवाग्राम येथे झालेले हे शिबीर विचारांची शिदोरी देणारे ठरले असून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात असे प्रशिक्षण शिबिर घेणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qE2qs4

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.