Type Here to Get Search Results !

पुणे हादरलं! आधी फेसबूक लाईव्ह आणि नंतर १३ व्या मजल्यावरून उडी घेत वेटरची आत्महत्या

पुणे : पुण्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलच्या टेरेसवर जाऊन वेटरने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री मुंढवा परिसरात घडली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कामगाराने फेसबुक लाईव्ह केले होते. हॉटेलमधील काही लोकांनी आपल्याला फसवले आहे आणि म्हणूनच आत्महत्या करणार असल्याचे त्याने फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटले होते. अरविंद सिंह राठोड (वय २६ )राहणार उत्तराखंड असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणात मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद मूळचा उत्तराखंडचा रहिवासी असून या परिसरातील हॉटेल पेंट हाउसमध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला आला होता. या ठिकाणी वेटरचे काम तो करीत होता. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो हॉटेलच्या टेरेसवर तेराव्या मजल्यावर गेला. त्या ठिकाणी जाऊन त्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Cvzx3v

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.