Type Here to Get Search Results !

विधान परिषदेसाठी भाजपनं राजहंस सिंह यांनाच का निवडले? काय आहे रणनीती?

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर () निवडून द्यावयाच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षानं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतून भाजपनं काँग्रेसमधून आलेले माजी आमदार () यांचं नाव निश्चित केलं आहे. त्यांच्या उमेदवारीमुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, महापालिकेची निवडणूक हे यामागचं कारण मानलं जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसनं रुपाली चाकणकर यांना संधी दिल्यामुळं भाजपकडून चित्रा वाघ यांच्या नावाची विधान परिषदेसाठी चर्चा होती. चित्रा वाघ या गेल्या दोन वर्षांपासून भाजपसाठी नेटानं किल्ला लढवत आहेत. महिलांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवून त्यांनी राज्य सरकारला अनेकदा अडचणीत आणलं आहे. त्याची बक्षिसी त्यांना मिळेल असं मानलं जात होतं. मात्र, २०१९ च्या निवडणुकीआधी भाजपमध्ये आलेल्या राजहंस सिंह यांना संधी दिली आहे. वाचा: राजहंस सिंह हे मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आहेत. महापालिका सभागृहात त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम केलं आहे. कुर्ला विभागातून नगरसेवक राहिलेले राजहंस सिंह २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम उपनगरातील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मुंबईतील प्रश्नांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. हिंदीबरोबच मराठी भाषेवरही त्यांची चांगली पकड आहे. त्यांच्या या प्रभावाचा मुंबई महापालिका निवडणुकीत पुरेपूर वापर करून घेण्याची भाजपची रणनीती असल्याचं बोललं जातं. वाचा: शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी घरोबा केल्यामुळं राज्याची सत्ता गमवावी लागलेल्या भाजपनं मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी सर्व प्रकारची गणितं जुळवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेला सोबत घेता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. त्याचवेळी, मुंबईत मोठ्या संख्येनं असलेल्या उत्तर भारतीय मतदारांवरही भाजपचा डोळा आहे. मुंबईतील बराच उत्तर भारतीय मतदार काँग्रेसला मानणारा आहे. या मतदारांना आकर्षित करणारा चेहरा भाजपकडं नव्हता. माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्यावर अनेक आरोप आहेत. शिवाय, सध्या ते फारसे सक्रिय नाहीत. अशा परिस्थितीत राजहंस सिंह हे उत्तर भारतीय मते खेचू शकतात, असा भाजपचा होरा आहे. त्याचा फायदा राजहंस सिंह यांना झाल्याचं सांगितलं जात आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FxzkyJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.