Type Here to Get Search Results !

तुमची 'ती' मानसिकता समजू शकतो; पवारांचे नाना पटोलेंना टोले

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरः राष्ट्रवादीचे दुकान बंद पाडण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष () यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) यांनी जोरदार टोला लगावला. 'ते पूर्वी ज्या पक्षाकडून विधानसभा आणि लोकसभा लढले, त्यांची मानसिकता व निष्ठा समजू शकतो', या शब्दांत त्यांनी हल्ला चढविला. चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येथे आमगन झाले असता बुधवारी भरगच्च पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी सर्व प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादीचे एकमेव दुकान बंद होईल, या नाना पटोले यांच्या टीकेकडे लक्ष वेधले असता, 'काँग्रेसप्रमाणेच आमची विचारधारा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची आहे. आम्ही थेट काँग्रेसमध्ये नसलो तरी याच विचारांवर चालतो. आमच्या मनातील भावना या विचारांशी सुसंगत आहे. मात्र, जे लोकसभा, विधानसभा भाजपकडून लढले त्यांची मानसिकता समजू शकतो', असेही पवार म्हणाले. टोकाला जाऊ नये देवेंद्र फडणवीस यापूर्वी गांभीर्याने बोलायचे. गेल्या चार-आठ दिवसांतील त्यांची वक्तव्ये उथळ आहेत. चंद्रकांत पाटील काय बोलतात, याची दखल घेतली जात नाही. मात्र, फडणवीस यांच्या वक्तव्यावरून सत्ता गेल्यानंतरची अस्वस्थता दिसून येते. मात्र, त्यांनी इतक्या टोकाला जाऊ नये, असा सल्ला पवारांनी दिला. राष्ट्रवादीने २०१४ साली भाजपला समर्थन दिले होते, याकडे लक्ष वेधले असता, 'त्यावेळची ती स्टॅटेजी होती', असे ते म्हणाले. राज्यातील नेतृत्वासाठी नितीन गडकरी यांना समर्थन राहील का, असे विचारले असता, 'हा प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारावा लागेल. मात्र, विकासासाठी गडकरी यांना आमचे पूर्ण सहकार्य राहील', असे शरद पवार यांनी सांगितले. थकबाकी हवी इंधनावरील जीएसटी कमी करण्याबाबत विचारले असता, केंद्राकडे असलेली थकबाकी मिळवणे आवश्यक आहे. या निधीची तिजोरीत भर पडल्यास असे निर्णय सहज घेता येतील, असेही शरद पवार म्हणाले. नेतृत्वाचा प्रश्न नाही संसदेच्या येत्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी चर्चा करण्यात येईल. तिसऱ्या आघाडीच्या पर्यायात नेतृत्वाचा प्रश्न नाही, असा दावा शरद पवार यांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबद्दल अद्याप कुठलीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. रझावर बंदीचा सरकारचा निर्णय राज्यातील दंगलीनंतर रझा अकादमीवर बंदी आणण्याच्या मागणीशी संबंधित प्रश्नाला शरद पवार यांनी बगल दिली. राज्य सरकारला यावर विचार करून निर्णय घ्यावा लागेल. विविध भागांत तणावाची स्थिती नियंत्रणात आणण्यात गृह विभागाने चांगले काम केले, असा दावा त्यांनी केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30BaIWQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.