Type Here to Get Search Results !

मुनगंटीवारांच्या कार्यक्षेत्रात पवारांची पहिली सभा, काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष?

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणजे पॉवर. या पॉवरला तोड नाही. पवारांचा डोक्यात काय चालतंय, भलेभले पंडीत सांगू शकणार नाही. धो-धो बरसणाऱ्या पावसात तुफान बँटींग करीत विरोधकांना भर पावसात घाम फोडला. महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यात चाणक्य ठरले ते पवारच. तब्बल चार वर्षानी शरद पवार चंद्रपूर जिल्हाचा दौऱ्यावर आहेत. आज मुल येथे सभा होत आहे. यावेळी पवार काय बोलतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार विदर्भाचा दौऱ्यावर आहेत. नागपूरात बोलातांना पवारांनी मोदी आणि भाजपाला कसं रोखणार ? याचा मेगा प्लान सांगितला. देशातील जनतेला पुढील लोकसभा निवडणुकीत राजकीय पर्याय देण्याची गरज आहे, असे विधान त्यांनी केले. पवारांच्या या विधानाने राजकीय वर्तूळाचा सगळ्यांच्याच भुवय्या उंचवाल्या. पवारांनी केलेल्या विधानाचा अर्थबोध विरोधक शोधत आहेत. अशात जिल्ह्यात भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या मुल मध्ये त्यांची आज सभा होते आहे. मुल हे सूधिर मुनगंटीवारांचे कार्यक्षेत्र. राज्यातील राजकारणात मुनगंटीवार मोठे नाव आहे. जिल्ह्यात पाय ठेवताच पवारांची पहीली सभा मुनगंटीवारांचा कार्यक्षेत्रात होत आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे. बड्या नेत्यांच्या भेटी राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा खासदार, आमदार नसतांना जिल्ह्यात पक्षाचा बड्या नेत्यांचा भेटी वाढल्या आहेत. खासदार सूप्रिया सूळे, मंत्री छगन भुजबळ यांनी भेटी दिल्या. पक्षातील बड्या नेत्यांचा भेटीने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार चंद्रपूर जिल्हाचा दोन दिवसाचा दौऱ्यावर येत आहेत. आज मुल येथील तालुका क्रिडा संकुलात दुपारी दोन वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित असणार आहे. येत्या काळात मनपा चंद्रपूर, जिल्ह्यातील दोन नगर परिषद, पाच नगर पंचायतेचा निवडणूक होणार आहेत. त्या अनुसंगाने हा दौरा महत्वाचा ठरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kPrEzZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.