Type Here to Get Search Results !

सतेज पाटलांविरोधात शौमिका महाडिक; भाजपने खेळली मोठी चाल

कोल्हापूर: विधान परिषदेच्या मतदारसंघातून भाजपच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. यामुळे पालकमंत्री विरोधात महाडिक अशी पुन्हा जोरदार टक्कर होणार असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. ( ) वाचा: कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री सतेज पाटील हे मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे यांच्यानावाबाबत चर्चा सुरू होती. पण ताकदीने निवडणूक लढविण्यासाठी महाडिक यांच्या घरातीलच उमेदवार असावा असा आग्रह भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी धरला आहे. त्यासाठी त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. महाडिक यांनी संमती दिल्याने शौमिका महाडिक यांच्या नावावर एकमत झाले आहे.याबाबत अधिकृत घोषणा दोन दिवसांत करण्यात येणार आहे. वाचा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर होते. तेथे पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनीही महाडिक यांच्या नावाला दुजोरा दिला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांना रोखण्यासाठी महाडिक, आवाडे आणि आमदार विनय कोरे यांची ताकद एकत्र करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी पालकमंत्री पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच तयारी केली आहे. ते सध्या सर्व मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'महाविकास आघाडी एकसंघ आहे. शिवाय स्वाभिमानी संघटना, शेकाप हे मित्रपक्ष सोबत आहेत. ४१६ पैकी सध्या २५३ मतदार सोबत आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.' वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FgikwH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.