Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार; मंत्र्यालाही रोखले, पण...

अहमदनगर : कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आज विविध कामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. आमदार हे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे कार्यक्रमाला निघालेले शिवसेनेचे मंत्री यांना रस्त्यातच अडवून त्यांच्याकडे यासंबंधी शिवसैनिकांनी तक्रार केली. कार्यकर्त्यांची समजूत काढून मंत्री सत्तार कार्यक्रमास आले आणि पवार यांच्या कौतुकाचे भाषणही केले. स्थानिक कार्यकर्ते मात्र आले नाहीत. ( ) वाचा: जामखेड आणि येथे आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे कर्जत तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तालुका प्रमुख बळीराम अण्णा यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कर्जत शहरात होत असलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला. मंत्री सत्तार कर्जतला यायला निघाले असता रस्त्यात मिरजगाव येथे त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला. त्यांना बहिष्काराची माहिती देऊन कार्यक्रमास उपस्थित राहू नये, असे सांगण्यात आले. आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सतत डावलतात, अपमानास्पद वागणूक देतात. कुठल्याही कार्यक्रमात अथवा विकासकामांच्या बाबतीत विश्वासात घेतले जात नाही. असेच जर पुढील काळात होत राहिले तर कर्जत तालुका भविष्यात आपली ताकद दाखवून देईल, असे यादव यांनी सत्तार यांना सांगितले. वाचा: युवा सेना तालुकाप्रमुख दीपक गांगर्डे, उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, महावीर बोरा, उपतालुकाप्रमुख सुभाष जाधव, अक्षय घालमे, तालुकाप्रमुख शिवाजी नवले, चंद्रकांत घालमे, शहरप्रमुख अक्षय तोरडमल यावेळी उपस्थित होते. शिवसैनिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री सत्तार तिथून निघाले. तुमच्या भावना मी आमदार पवार यांच्या कानावर घालतो. यापुढे असे प्रकार होऊ नयेत, यासंबंधी मी तेथे बोलतो असे सांगून मंत्री सत्तार तेथून कर्जतला आले आणि कार्यक्रमास उपस्थित राहिले. प्रत्यक्षात भाषणात त्यांनी याबद्दल काहीही उल्लेख केला नाही. याउलट आमदार रोहित पवार यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, रोहित पवार मंत्रालयात काम घेऊन आले की आम्हाला आधार वाटतो. कारण त्यांच्या कामात आमचेही काम मार्गी लागून जाते. ‘तुम्हारे खत में हमारा सलाम,’ म्हणतात तसे त्यांच्याच फाइलमध्ये आम्ही आमचीही कामे करून घेतो, असेही सत्तार म्हणाले. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मात्र कार्यक्रमाकडे आले नाहीत. त्यांच्या या भूमिकेला मंत्र्यांनीही साथ न दिल्याने वेगळी चर्चा सुरू झाली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wGA81f

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.