Type Here to Get Search Results !

नवाब मलिक यांच्या जावयाच्या अडचणी वाढणार?; NCBचा कोर्टात अर्ज

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्ज प्रकरण, प्रकरण व अन्य चार प्रकरणांचा नव्याने तपास सुरू असून एनसीबीने आज एनडीपीएस कोर्टात समीर खान प्रकरणाच्या अनुषंगाने एक अर्ज केला आहे. एनसीबीने अर्जात केलेली विनंती पाहता समीर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर खान हे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांचे जावई आहेत. ( ) वाचा: समीर खान प्रकरणात आता एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक व येथील अन्य अधिकाऱ्यांऐवजी दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी तपास करत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची नव्याने पडताळणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून समीर खान आणि अन्य दोन जणांच्या आवाजाचे नमुने एसआयटीला घ्यायचे आहेत. त्यासाठी एनसीबीकडून आज विशेष एनडीपीएस कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. ही परवानगी मिळाल्यास तिघांचेही आवाजाचे नमुने घेऊन पुढील तपास केला जाणार आहे. वाचा: दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात समीर खान आणि ब्रिटिश नागरिक या दोघांना याचवर्षी जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. दोघांकडे मोठ्या प्रमाणात सीबीडी आणि गांजा सापडल्याचा एनसीबीचा दावा होता. त्यातील एकूण १८ सँपल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ११ सँपलचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. एनसीबीच्या तपासात समीर खान आणि करन सजनानी यांच्यातील व्हॉइस चॅटची तपासणी करण्यात आली होती. काही आवाजाचे नमुने गोळा करून त्यांचीही पडताळणी करण्यात आली होती. आता पुढील तपासासाठी आवाजाचे नमुने नव्याने तपासावे लागणार असून त्यासाठीच एनसीबीने कोर्टात अर्ज केला आहे. या प्रकरणात आधीच्या तपास पथकाने आरोपपत्र दाखल केलेलं आहे. समीर खान आणि करन सजनानी या दोघांची जामिनावरही सुटका झालेली आहे. त्यामुळे आता नव्याने तपास सुरू झाल्यानंतर येत्या काळात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fe8pYA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.