Type Here to Get Search Results !

'आणखी एक 'फर्जीवाडा''; नवाब मलिक यांचा वानखेडेंवर पुन्हा निशाणा

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी आज पुन्हा एकदा ट्विटरवरुन एनसीबीचे अधिकारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आणखी एक फर्जीवाडा म्हणत नवाब मलिकांनी काही कागदपत्र ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. आर्यन खान प्रकरणानंतर नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीका करताना दिसत आहे. त्याचबरोबर, वानखेडे यांच्या कथित भ्रष्टाचाराचा पुरावा म्हणून त्यांच्या खासगी आयुष्यातील काही कागदपत्रेही मलिक यांनी समोर आणली आहेत. वानखेडे यांच्या कौटुंबिक व धार्मिक पार्श्वभूमीवरही मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. समीर वानखेडे व नवाब मलिक यांच्यातील वाद हा कोर्टातही जाऊन पोहोचला आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिकांना बोलण्यापासून नवाब मलिकांना रोखता येणार नाही, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यानंतर नवाब मलिकांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक ट्वीट करुन समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचाः नवाब मलिक यांनी काही कागदपत्रे शेअर केली आहेत. यात महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या आई झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर, मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद करण्यात आली असल्याची कागदपत्र नवाब मलिकांनी शेअर केली आहेत. ही दोन कागदपत्रे शेअर करताना नवाब मलिक यांनी आणखी एक फर्जीवाडा, असं म्हटलं आहे. अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव, अशी खोचक प्रतिक्रिया नवाब मलिकांनी ट्विटरवर दिली आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r4rV6d

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.