Type Here to Get Search Results !

अमित शहा - शरद पवार यांच्यात भेट?; नवाब मलिकांनी सांगितलं सत्य

मुंबईः सोशल मीडियावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar), केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळं राज्यात सत्तांतराच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या फोटोमागचे सत्य समोर आणले आहे. तसंच, यावरुन भाजपवर निशाणाही साधला आहे. () राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मार्चपर्यंत कोसळणार असल्याचे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्याने चर्चेना उधाण आलं आहे. तसंच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील दिल्लीत आहे. या घडामोडींमुळं राज्यात ऑपरेशन लोटसचे संकेत दिले जात होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. वाचाः 'काल पवार प्रफुल्ल पटेल हे संसदीय समिती आणि संरक्षण समितीच्या बैठकीला गेले होते. दोघेही दिल्लीत होते. राणेंनी मार्चमध्ये सरकार बनवणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर एक मॉर्फ फोटो पाठवला. अमित शहा शानमध्ये बसले. पवारांचा ज्या पद्धतीने फोटो व्हायरल केला तो अपमानित करण्याचा प्रकार होता. तो मॉर्फ फोटो होता. भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा अधिक काळ चालणार नाही. आम्ही पवारांचा खरा फोटोही व्हायरल केला. फर्जीवाडा उघड केला. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. त्यांनी वारंवार खुशाल भविष्यवाणी करावी, फडणवीस आणि पाटलांनी सातत्याने स्वप्नं पाहावी,' असा टोला त्यांनी लगावला आहे. वाचाः नवाब मलिक यांनी शुक्रवारी एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोत अमित शहा, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. मात्र, हा फोटो खोटा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा असल्याचं म्हटलं आहे. या फर्जीवाड्याच्या आधारे केंद्रीय मंत्री मार्च महिन्यात सरकार बनवण्याचा दावा करत आहेत का?, असा सवाल केला होता.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cR22OH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.