Type Here to Get Search Results !

मुंबई पुन्हा हादरली! २० वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या

मुंबईः मुंबई पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरात असलेल्या एचडीआयले कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्टच्या बाजूला तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. तरूणीची ओळख अद्याप पटली नसून पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला आहे. () कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाउंडमध्ये या तरुणीचा मृतदेह सापडला. एका बंद पडलेल्या इमारतीच्या टेरेसवर मृतदेह सापडल्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह राजावडी रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वाचाः तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का, याची चौकशी पोलीस करत आहेत. काही तरुण एचडीआयएल कंपाऊंडमधील बंद असलेल्या इमारतीवर इन्स्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी टेरेसवर तरुणीचा मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. वाचाः दरम्यान, मुंबईतील घृणास्पद असे शक्तीमिल सामूहिक बलात्कार, बेलापूरमधील सामूहिक बलात्कार व हत्या आणि ठाणे कासारवडवली येथील चिमुकलीवर करण्यात आलेला बलात्कार व हत्या या तीन गुन्ह्यांच्या प्रकरणांत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने गुरुवारी आपले निर्णय जाहीर केले. शक्तीमिल प्रकरणातील तिघांची फाशी रद्द करताना, त्यांना नैसर्गिक मरण येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली; तर बेलापूरच्या प्रकरणातील दोषीची फाशीची शिक्षा रद्द करतानाच त्याला संशयाचा फायदा देत उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. मात्र, ठाण्यातील बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने दोषीची शिक्षा कायम ठेवत त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D25hxn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.